घनसावंगी: घनसावंगी तालुक्यात विजेच्या प्रवाहाचे दोन बळी; महावितरणच्या निष्काळजीपणावर संताप
घनसावंगी तालुक्यात विजेच्या प्रवाहाचे दोन बळी; महावितरणच्या निष्काळजीपणावर संताप आज दिनांक 6 सोम रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यात रविवारी घडलेल्या दोन वेगवेगळ्या विजेच्या अपघातांमध्ये दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतात तुटलेल्या वीजतारा आणि प्रवाहित तारांच्या संपर्कात आल्याने हे दोन्ही अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, या घटनांमुळे महावितरणच्या निष्काळजी कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पहिली घटना ब