खंडाळा: पुरंदर, भोर आणि खंडाळा तालुक्यातील वीटभट्टी चालकांना करोडोंचा गंडा : कामगार देतो असे सांगत दलालांकडून फसवणूक
भोर तालुक्यासह पुरंदर व सातारा जिल्ह्यातील खंडाळा या तीन तालुक्यातील पाच वीटभट्टी मालकांना परराज्यातील टोळीने सुमारे १ कोटी ४२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती वीट भट्टी चालकांनी शनिवारी सकाळी ११ वाजता दिली. भोर तालुक्यातील चार वीटभट्टीमालकांचे प्रत्येकी २ लाख तर एकाच्या ३० हजार रुपयांच्या रक्कमेचा समावेश आहे.