ठाणे: राष्ट्रीय पोलीस हुतात्मादिनानिमित्त ठाणे पोलीस मुख्यालय येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहिदांना केले अभिवादन
Thane, Thane | Oct 21, 2025 राष्ट्रीय पोलीस हुतात्मादिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे पोलीस मुख्यालय येथे उपस्थिती राहून पोलीस शहीद स्मारकांना भेट देऊन अभिवादन केले आणि मानवंदना दिली. तसेच शहीद झालेल्या पोलीस बांधवांच्या कुटुंबीयांची आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेऊन आम्ही सारे आपल्या सोबत आहोत असे आश्वस्त केले. यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.