हवेली: लोणी काळभोर येथील रामदऱ्याचा कॅनॉल वरील जुना नादुरुस्त पूल पाडला गेला.
Haveli, Pune | Oct 7, 2025 रामदरा कॅनॉलवरील जुन्या आणि नादुरुस्त झालेल्या पुलाचा अखेर ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली पडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, आता नवीन पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीकडून तात्पुरत्या स्वरूपात शेजारील मार्गावरून मोठ्या पाण्याच्या नळ्या टाकून पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.