सेनगाव: अाजेगांव शिवारात नीलगाईच्या पिल्याला प्राणीमित्रांनी दिले जीवनदान
सेनगांव तालुक्यातील आजेगांव शिवारात नीलगाईच्या पिल्याला प्राणी मित्रांनी जीवनदान देऊन सुरक्षित ठिकाणी सोडून दिले आहे. आज दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12 वाजता आजेगांव शिवारात नीलगाईचे पिल्लू प्राणी मित्र भीमराव भुक्तर व शंकर भैराने यांना आढळून आले. यावेळी त्याची देखभाल घेऊन कुत्र्यापासून त्याचा बचाव केला व त्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी सोडून दिले या उत्कृष्ट कार्याबद्दल प्राणी मित्रांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.