महाड: शिरगावचे सरपंच ओझर्डेंचे ओपन चॅलेंज.
विकास गोगावलेंनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी
Mahad, Raigad | Oct 14, 2025 शिरगावचे सरपंच तथा शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे हे करंजाडी जिप मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. नुकत्याच झालेल्या जिप आरक्षणामध्ये हा मतदारसंघ सर्वसाधारणउमेदवारासाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग देखील खुला झाला आहे. त्यांनी मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांना या मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याचे ओपन चॅलेंज दिले आहे.