नागपूर शहर: लग्नाचे नाते मोडल्याने संतापलेल्या तरुणाचा मंडप पेटवण्याचा प्रयत्न; आरोपीला अटक: हरेश काळसेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 10 मेला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नगर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीचे लग्न ठरल्याच्या रागातून तिच्या मित्राने लग्नाचा मंडप पेटवून देण्याचा प्रयत्न केला.