नागपूर शहर: तिसऱ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू; निष्काळजी कंत्राटदारावर संताप, मृतदेह गेटबाहेर ठेवून केले आंदोलन
हजारीपहाड येथील एका इमारतीला रंगकाम करत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडून उमेश धुर्वे या मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा साधने न पुरवल्याने हा अपघात घडला.मृत मजुराचा विमा नसल्याचे समोर आल्यानंतर संतप्त नागरिक आणि सहकाऱ्यांनी मृतदेहासह आंदोलन केले.