फुलंब्री तालुक्यातील वाणेगाव येथील विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकाराने फुलंब्री पोलीस ठाण्यात सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातेवाईकांनी सुमारे पाच तास फुलंब्री पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात नातेवाईकांची उपस्थिती होती.