नागपूर शहर: साई मंदिर परिसरात तरुणीची छेडछाड : साईनाथ रामलोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक
धंतोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामलोड यांनी 4 जुलैला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार धंतोली पोलीस ठाणे परिसरातील साई मंदिराजवळ दर्शनासाठी आलेल्या एका २० वर्षीय तरुणीची ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीने छेड काढल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणीने विरोध केल्यावर नशेत असलेल्या आरोपीने तिला मारहाण करून लोखंडी खांबावर ढकलले, ज्यात ती जखमी झाली. उपस्थित नागरिकांनी आरोपीला चोप दिला याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ राम लोड यांनी दिली आहे.