नागपूर शहर: डिजिटल अरेस्ट' ही कायदेशीर प्रक्रिया नाही, पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन!
अलिकडच्या काळात सायबर गुन्हेगारांकडून 'डिजिटल अरेस्ट' (Digital Arrest) नावाचा वापर करून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित एका विशेष जनजागृती कार्यक्रमात पोलीस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी फसवणूक झालेल्या काही पीडितांचे पैसे यशस्वीरित्या परत मिळवून दिले आहेत.