नागपूर शहर: वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक: विनायक गोल्हे, पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी 11 मे ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १७ एप्रिल रोजी चोरीला गेलेली 'हीरो स्प्लेंडर' बाईक शोधण्यात गुन्हे शाखा युनिट ५ ला यश आले आहे. याप्रकरणी मोहम्मद रजा आणि मयसर जमाल या दोन आरोपींना 'गमदुर बार' परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली.याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली आहे.