अलिबाग: सुक्या मच्छीसह वाळवणाला मागणी
Alibag, Raigad | Apr 10, 2026 पावसाळ्याला अजून दोन महिने उरले असले तरी रायगडात आतापासूनच आगोटची तयारी सुरू झाली आहे. विशेष करुन सुकी मच्छीखरेदीकडे कल वाढला आहे. त्या मच्छीचा घमघमाट अलिबागसह विविधठिकाणच्या मच्छी बाजारात सुटला आहे. रायगड आणि सुकी मच्छी यांच अतुट असे नातं. दरवर्षी लाखो टन सुकी मच्छीची उलाढाला रायगडात होते. पावसाळ्यात तर सुकी मच्छीला जादा भाव असतो. पावसाळ्यात मासळी हंगाम बंद असतो. त्यामुळे खवय्यांना सुकी मच्छीवरच ताव मारावा लागतो. पण सुकी मच्छीही जेवणाची लज्जत वाढविणारी असते.