घनसावंगी: घनसावंगीत खरिपाच्या पेरण्यांना वेग; कृषी विभागाचा इशारा – १०० मिमी पावसाशिवाय पेरणीची घाई टाळा..
घनसावंगीत खरिपाच्या पेरण्यांना वेग; कृषी विभागाचा इशारा – १०० मिमी पावसाशिवाय पेरणीची घाई टाळा.. आज दिनांक 29 सोमवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मान्सूनने अखेर हजेरी लावल्यानंतर घनसावंगी तालुक्यात खरिपाच्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांतील पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद व मका पिकांच्या पेरणीला सुरुवात केली असून शेतांमध्ये सध्या लगबगीचे वातावरण पाहायला मिळत आहे. बियाणे व खतांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रांवरही शेतकऱ्यांची मोठी गर्दी