सडक अर्जुनी: सडक अर्जुनी येथील निवासस्थानी माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन जाणून घेतल्या समस्या
सडक अर्जुनी येथील निवासस्थानी माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी क्षेत्रातील नागरिकांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वीज, आरोग्य व इतर नागरी समस्यांबाबत नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. यावेळी प्रत्येक समस्या लक्षपूर्वक ऐकून संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.