नागपूर शहर: नागपुरात दोन कारची भीषण धडक; एक महिला गंभीर जखमी
अलंकार टॉकीज चौकात मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शंकरनगर चौकाकडून सीताबर्डीकडे जाणाऱ्या 'कोरोला' कारला व्हीआयपी रोडकडून येणाऱ्या इनोव्हा कारने जोरदार धडक दिली. या अपघातात 'कोरोला' कारमधील पुनम योगेंद्र सिंग ही महिला गंभीर जखमी झाली आहे.