लातूर -राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज सकाळी बाभळगाव येथील निवासस्थानी ‘जनसंवाद’ कार्यक्रम घेतला. लातूर शहर तसेच जिल्ह्यातील विविध संस्था पदाधिकारी, काँग्रेस पदाधिकारी आणि नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार देशमुख यांना आपापल्या समस्या मांडल्या.आमदार देशमुख यांनी उपस्थित नागरिकांच्या अडीअडचणी, तक्रारी आणि मागण्या ध्यानपूर्वक ऐकून घेतल्या.