मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील 3 वर्षीय निरागस चिमुकली प्रज्ञा दुसाने वर विजय खैरनार नामक आरोपीने अत्याचार करून तदनंतर दगडाने ठेचून तिची क्रूरपणे हत्या केली. या अमानुष प्रकरणाचा जाहीर निषेध नोंदवीत आज 19 नोव्हेंबर बुधवार रोजी दुपारी १ वाजता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आशापुरी सोनार महिला मंडळ, अमरावती च्या वतीने निवेदन देण्यात आले. या प्रकरणी विजय खैरनार या आरोपीला पोकसो अंतर्गत कठोर कारवाई करून त्याला शीघ्रतम फाशीची शिक्षा देण्यात यावी. यासोबतच गावात आणि जिल्ह्यात अशा....