गडचिरोली: आलापल्ली येथील घराची पडझड झालेल्या नुकसानग्रस्त महिलेला माजी जिल्हा परिषद अध्यक्षानी दिला मदतीचा हात
आलापल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्र.2 मधील टेकडी कॉलनी श्रमिक नगर येथील रुक्साना रियाज शेख यांची राहते घर सततधार पाऊस अन वादळ वाऱ्यामुळे घराला लागून असलेल्या सागवानाचे झाड अचानक घरावर कोसळल्याने त्यांचे राहते घर पूर्णपणे उद्वस्त झाल्याची घटना घडली.या घटनेमुळे सदर महिला ही बेघर झाली होती त्यामुळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मदतीचा हात दिला