नागपूर शहर: पुणे येथील घटनांचे नागपुरात तीव्र पडसाद; अभाविपचे व्हेरायटी चौकात जोरदार आंदोलन
पुणे येथे ४ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण राज्य हादरले असतानाच, अकोला जिल्ह्यातूनही अशाच प्रकारची संतापजनक घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ नागपुरात संतापाची लाट उसळली असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज व्हेरायटी चौक येथे एकत्र येत आक्रमक आंदोलन केले.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी आरोपींविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. "नराधमांना कठोर शासन झालेच पाहिजे" अशा घोषणांनी व्हेरायटी चौक परिसर दणाणून गेला