उत्तराखंडमधील गंगोत्री जवळील गंगाननी येथे भाविकांची कार अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळल्याने नागपूरच्या एका वृद्ध दाम्पत्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. दामोदर हरिरामजी रामटेककर (वय ७७) आणि लक्ष्मी दामोदर रामटेककर (वय ६७) अशी मृत पावलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.