हिंगोली: हिंगोलीत आदिवासी जमिनीचा बनावट कागदपत्रांनी खरेदी-विक्रीचा प्रयत्न, 4 जणांवर गुन्हा
हिंगोली तालुक्यात लोहरा शिवारात आदिवासी जमिनीवर बनावट कागदपत्रांद्वारे खरेदी-विक्री करण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी खरेदीदारासहित चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवलाय. कारवाई रविवारी रात्री झाली असून तपास सुरू आहे.