लातूर: तेरणा धरणाचा पाणीप्रवाह वाढला; उजणी बाजारपेठ जलमय, महामार्ग वाहतूक ठप्प, पुराच्या पाण्याने उजनी गावाचा परिसराला वेढा
Latur, Latur | Sep 14, 2025 लातूर -लातूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असली तरी शेजारील धाराशिव जिल्ह्यातील तेरणा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं तेरणा नदीला अचानक पूर आला आहे. या पुराच्या पाण्याने उजणी गावासह परिसराला वेढा दिला आहे.उजणी गावातील तेरणा नदीवरील पुलावर पाणी पातळी वाढल्याने औसा–तुळजापूर–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे. या मार्गावरून सुरू असलेली हलकी व जड वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.