नाशिक: नांदूर नाका येथील किरकोळ कारणातून झालेल्या राहुल धोत्रे हत्याकांडा प्रकरणी माजी नगरसेवक उद्धव निमसे पोलिसांच्या ताब्यात
Nashik, Nashik | Sep 15, 2025 नांदूर नाका येथे मोटरसायकलचे चाक पायावरून गेल्याच्या किरकोळ कारणावरून निमसे आणि धोत्रे गटामध्ये झालेल्या हाणामारीत राहुल धोत्रे याचा औषध उपचारादरम्यान मृत्यू झाला होता आडगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह 11 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर उद्धव निमसे हे फरार झाले हायकोर्टात त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सुद्धा टाकला परंतु तो फेटाळण्यात आला.निमसे हे स्वतः गुंडाविरोधी पथकाकडे स्वाधीन झाले आहे.