अल्पसंख्यांक नागरीकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे, तसेच याबाबतच्यावैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी, यासाठी १८ डिसेंबर हा अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने १८ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात येणार आहे.