कोपरगाव नगरपालिका निवडणूक अर्ज माघारीच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत नेते मंडळींची धावपळ पहावयास मिळाली. सुहासिनी कोयटे यांनी आपले पती काका कोयटे यांच्यासाठी आपला अर्ज मागे घेतला. आता नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात आठ उमेदवार आहेत. नगरसेवकपदाच्या ३० जागांसाठी १५२ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पैकी २५ जणांनी आज २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत शुक्रवारी माघार घेतली. आता निवडणूक रिंगणात विविध प्रभागातून १२७ उमेदवार राहिले आहेत.