गोंदिया जिल्हा परिषद,अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत केंद्रस्तरीय महोत्सव सिलेझरी येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर उपस्थित होते.२ वर्ष पूर्वी गोंदिया जिल्हा परिषदेने अटल क्रीडा महोत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यंदाचे तिसरे वर्ष असून या वर्षी सुद्धा क्रीडा आणि सांस्कृतिक कला उदयास येतील.शालेय अभ्यासक्रमासोबत क्रीडा आणि सांस्कृतिक छंद सुद्धा आपण सर्वांनी जोपासला पाहिजे, असे प्रतिपादन केले.