जालना: गुन्हा दाखल नसतांनाही मध्यरात्री घरातून उचलून नेले; सोडण्यासाठी 12 हजार घेतल्याचा आरोप; तक्रार केल्यास सरपंचावर कारवाई
Jalna, Jalna | Sep 28, 2026 मंठा तालुक्यातील बेलोरा चौफुली परिसरात जमीन व घराच्या मालकीवरून सुरू असलेल्या वादाला आता पोलिसांवरील गंभीर आरोपांची किनार लागली आहे. गुन्हा दाखल नसतानाही मध्यरात्री घरातून जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि पोलीसांच्या ताब्यातून सोडण्यासाठी सरपंचामार्फत 12 हजार रुपये घेतल्याचा आरोप रामेश्वर गणेश राठोड यांनी केला आहे. सोमवार दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी राठोड कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.