अलिबाग: प्रियकराचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला
डोक्यावर, कपाळावर लोखंडी हातोड्याचे घाव
अलिबागमधील कनकेश्वर येथील मंदिराजवळील घटना
Alibag, Raigad | Oct 14, 2025 डोक्यावर, कपाळावर लोखंडी हातोड्याचे घाव करून प्रेयसीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न प्रियकराने केला. ही घटना शुक्रवारी (दि.10) सायंकाळी अलिबाग जवळील कनकेश्वर येथील मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी प्रियकराविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयाच्या कारणावरून त्याने तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.