अमरावती: प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती – आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पाहणी, नागरिकांना सहकार्याचे आवाहन
अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज १६ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजता विठ्ठलवाडी जुनीवस्ती, बडनेरा येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या साईटवर नागरिकांच्या तक्रारीनुसार साफसफाई व रस्त्यांची पाहणी केली.यावेळी सर्व्हे क्र. १०/३ येथे जीडीसीएल या जुन्या कंत्राटदाराने केलेल्या बांधकामातील त्रुटींविषयी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली. तसेच पवननगर नवीवस्ती, सर्व्हे क्र. १९९ येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाची सखोल पाहणी करून कंत्राटदारांच्य....