देवरी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील ग्राम शिरपूर/बांध शिवारात दि. २० जानेवारीला ट्रक चालकाचे ट्रॅकवरून नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. यात सुदैवाने जीवित हानी टळली. परंतु, वाहनाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले.प्राप्त माहितीनुसार, देवरी पोलीस स्टेशन हद्दीतून जाणाऱ्या रायपूर नागपूर महामार्ग क्र. ५३ वरील मौजा शिरपूर/बांध शिवारात सदर मालवाहक क्र. एम एच ४० सी टी ०६४२ किराणा माल घेऊन नागपूरकडून रायपूरच्या दिशेने जात असताना, हा अपघात घडला.