अमरावती: स्वस्थ नारी,सशक्त परिवार अभियान अमरावतीत राबविण्यात येणार,अमरावती स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ ठरणार विकसित भारताचा
महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली आज १५ सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी साडे चार वाजता सभा घेण्यात आली. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निर्देश दिले की, “स्वस्थ नारी, सशक्त परिवार या राष्ट्रीय अभियानाचे उद्दिष्ट महिलांचे आरोग्य सुदृढ ठेवणे आणि कुटुंब सशक्त करणे हे आहे. त्यामुळे हे अभियान अमरावती महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून कार्य करावे. आरोग्य शिबिरांमध्ये महिलांची तपासणी, माता-बाल आरोग्य...