नागपूर शहर: महसूल अधिकारी हे जनता आणि सरकारमधील दुवा: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी मध्ये पार पडलेल्या भारतीय महसूल सेवा प्रशिक्षणार्थींच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. महसूल अधिकारी हे केवळ कर संकलक नसून ते नागरिक आणि सरकारमधील महत्त्वाचा 'सेतू' आहेत, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.अधिकाऱ्यांचे वर्तन संतुलित आणि पारदर्शक असावे, जेणेकरून जनतेचा कर प्रणालीवर विश्वास वाढेल.