अकोला शहरातील खदान परिसरातून 14 वर्षीय ऋषीकेश संतोष कनोजिया हा मुलगा हरवला आहे. सरकारी गोदामाच्या मागे राहणारा ऋषीकेश आज दि. 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता रागाने बेगम मंजिल समोरून निघून गेला असून त्यानंतर तो घरी परतला नाही. त्याचा शोध सुरु असून नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, जर तो कुणाला दिसला तर कृपया तात्काळ 9822385957 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. पोलीस आणि परिवार त्याच्या शोधात आहेत.