रामगावात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
814 views | Mangrulpir, Washim | Sep 24, 2025 वाशिम (दि.२३,सप्टेंबर): मंगरुळपीर तालुक्यातील रामगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत एक विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये आरोग्य विभागाने लोकांची तपासणी करून महिला आणि त्यांच्या कुटुंबांना ABHA कार्ड आणि MJPJAY कार्ड वितरित करण्यात आले. तसेच, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धनश्री जाधव यांनी लोकांना आरोग्य विभागाच्या विविध योजनांबद्दल सखोल माहिती दिली. या शिबिरामुळे लोकांना शासकीय विविध योजनाचा फायदा झाला.