नागपूर शहर: खंडणीसाठी अथर्व चे अपहरण, बेशुद्ध न झाल्याने करण्यात आला खून : पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी 6 एप्रिलला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार , नागपूर जिल्ह्यातील गाजत असलेल्या अथर्व नानोरे हत्याकांड प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अथर्वाचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याला बेशुद्ध करण्यासाठी औषध देण्यात आले परंतु तो आरडाओरडा करू नये म्हणून त्याचा खून झाला. याप्रकरणी त्याच्या परिसरातच राहणाऱ्या आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करीत आहे.