नागपूर शहर: धक्कादायक! दुचाकीच्या किरकोळ अपघातानंतर १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला
20 मे ला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली परिसरातील भीम चौक येथे एका १८ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ईशान ठाकूर असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ईशान आपला व्हिडिओ शूट करून घरी परतत असताना वाइन शॉपजवळ त्याची दुचाकी दुसऱ्या एका दुचाकीला धडकली. "बघून चालवा," असे ईशानने म्हणताच आरोपींनी संतापून त्याच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. याबद्दलची अधिक माहिती पीडित व्यक्तीने दिली आहे