भिवंडी: भिवंडीत पुन्हा अग्नितांडव, साठवलेल्या कपड्याचे गोडाऊन जळून खाक
Bhiwandi, Thane | Oct 22, 2025 भिवंडी परिसराच्या रहाणाळ भागामध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. मनी सुरत कंपाउंड येथील महादेव मडवी कॉम्प्लेक्स मधील कपडे साठवलेल्या गोदामा मध्ये आग लागली आणि काही वेळातच रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दर घटनास्थळी दाखल झाले आणि अनेक तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत आगीत गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाले होते. इतकी होती की आगीमध्ये गोडाऊनच्या भिंती देखील पडल्या आहेत. जीवित हानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.