पालघर: बर्निंग ट्रकचा थरार; राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण नजीक धावत्या ट्रकला लागली आग
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार पहावयास मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जात असलेल्या एका धावत्या ट्रकला मेंढवण नजीक अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले व संपूर्ण ट्रक आगीच्या भक्षस्थानी आला. ट्रकला आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.