सुधागड: पाली नगरपंचायतीच्या डम्पिंगग्राऊंडचा प्रश्न कायम
पाली नगरपंचायतीच्या टेंबी येथील डम्पिंग ग्राऊंडवरील प्रदूषणाचा प्रश्न अद्यापही जैसे थे असून, कचरा व्यवस्थापनासाठी प्रस्तावित बेलिंग व श्रेडिंग प्रकल्प केवळ आश्वासनांपुरताच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. डम्पिंग ग्राऊंडवरील धुसमसणारा कचरा, दुर्गंधी आणि विषारी धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रकल्पासाठी आवश्यक वीजभार उपलब्ध नसल्याने काम रखडल्याची माहिती समोर आली आहे.