पनवेल: पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातून 50 लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार
Panvel, Raigad | Apr 13, 2026 भारतीय निवडणूक आयगाच्या वतीने 'विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर)' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करणे हा आहे. या प्रक्रियेदरम्यान मृत, स्थलांतरित, डुप्लिकेट, बेकायदेशीर बांगलादेशी अपात्र मतदारांची नावे वगळण्याचे काम करण्यात येत आहे. या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर नावे तपासण्यात आली असून पश्चिम बंगालमध्ये सुमारे 90 लाख घुसखोर बांगलादेशींची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.