नागपूर शहर: हॉटेल मालकाची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला, १२ तासांत आरोपी अटकेत: अनिल ताकसांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
जरीपटका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी 23 एप्रिल ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार जरीपटका पोलिसांनी एका खळबळजनक हत्याकांडाचा अवघ्या १२ तासांत छडा लावला आहे. पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून एका हॉटेल मालकाची निर्घृण हत्या करण्यात आली. राहुल साहूअसे मृतकाचे नाव असून, तो जिंगाबाई टाकळी येथील रहिवासी होता. या प्रकरणी पोलिसांनी नवीन पुणकर या आरोपीला अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी दिली आहे.