नागपूर शहर: नागपुरात 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत गांजासह तीन आरोपींना अटक; मुख्य आरोपीचा शोध सुरू: संदीप बुवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 29 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत यशोधरानगर पोलिसांना मोठे यश आले आहे. गस्तीदरम्यान पोलिसांनी तेलंगणा राज्यातील तीन संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त केला आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे