नागपूर शहर: बावनकुळेंची विविध विषयांवर स्पष्ट भूमिका; खत टंचाई, राजकारण आणि कायदा-सुव्यवस्थेवर भाष्य
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध जनहितार्थ आणि राजकीय विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.खत विक्रेत्यांच्या संपावर सरकार लक्ष ठेवून असून, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.विजय वडेट्टीवारांच्या मोदींवरील टीकेचा समाचार घेत हे 'काँग्रेसमध्ये मार्क मिळवण्यासाठी सुरू असलेले नाटक' असल्याचे त्यांनी म्हटले. बच्चू कडूंच्या निर्णयावरही त्यांनी भाष्य केले.