अकोट नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार सौ मायाताई विवेक धुळे ह्या विजयी झाल्या त्यांनी एमआय पक्षाचे उमेदवार यांचा पराभव करत विजय मिळवला सौ.माया धुळे यांना एकूण 15,928 मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 5271 मतांनी पराभव केल्याची प्राथमिक आकडेवारी प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे तर भाजप उमेदवार माया धुळे यांच्या विजयाची घोषणा होताच भाजप कार्यकर्ता पदाधिकारी यांनी गुलालाची उधळण करत विजयाच्या घोषणा देत जल्लोष साजरा केला.