आज दिनांक एक जानेवारीला पोलीस सूत्रांकडून नुकतेच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शेताच्या धूर्यावरील छोटे लोखंडी पोल काढण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात, दगड मारून जखमी केल्याची घटना 31 डिसेंबरला एक वाजून 30 मिनिटांनी घडली आहे. याबाबतीत दीपक पंजाबराव चौकीकर यांनी दिनांक 21 डिसेंबरला सहा वाजून 39 मिनिटांनी मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी दिलीप चौकीकर व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे