नागपूर शहर: मेडिकल चौकातील धक्कादायक प्रकार: फूड डिलिव्हरी बॉयला चाकूचा धाक दाखवून लुटले, घटनेचे सीसीटीव्ही वायरल
मेडिकल चौक परिसरातून कामावरून घरी परतणाऱ्या एका फूड डिलिव्हरी बॉयला तीन भामट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजाबाक्षा हनुमान मंदिराच्या जवळ दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी डिलिव्हरी बॉयला चाकूचा धाक दाखवून धमकावले आणि त्याच्याकडील मोबाईल व ३ हजार रुपये रोख रक्कम लंपास करून घटनास्थळावरून पोबारा केला.