सिंधी समाजाच्या तीव्र निषेध मोर्चाची! छत्तीसगडच्या एका राजकीय नेत्याच्या वादग्रस्त विधानामुळे देशभरातील सिंधी समाजात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील वर्धा शहरात आज सिंधी समाजाने भव्य निषेध मोर्चा काढत आपला तीव्र संताप व्यक्त केला असल्याचे आज 3 नोव्हें रोजी रात्री 10वाजता प्रसिद्धीस दिले.छत्तीसगडमधील जे.सी.पी. पार्टीचे नेते अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झूलेलालजी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अपशब्द वापरले आहे