अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी पोक्सो अंतर्गत ऑगस्ट २०२२ मध्ये नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात आज शुक्रवार १९ डिसेंबर रोजी सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्यायाधिश निरंजन एन नाईकवाडे यांच्या न्यायालयाने आरोपी प्रशांत बळीराम काळबांडे यास २० वर्ष सक्तमजुरी, ४० हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात १३ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे पिडितेची साक्ष महत्वाची ठरली.