शहरातील प्रभाग क्र १० मधून उबाठाचे उमेदवार दिलीप बोचे व सौ विजया दिलीप बोचे हे पती-पत्नी मशाल चिन्हावरती निवडून आले. अकोटच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच पती-पत्नी निवडून आल्याने या दोन्ही विजयी उमेदवारावर सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत होता. अकोट नगरपालिकेच्या एकूण 33 नगरसेवक पदाच्या निवडणुकीचे निकाल आज घोषित करण्यात आले पोपटखेड रोड मार्गावरील ट्रायसेम हॉल येथे ही मतमोजणी पार पडली यात पती-पत्नी विजय झाल्याने सर्व स्तरातील अभिनंदन होत होते.